द्रुतगती महामार्गावर पोलीस आणि दरोडेखोर ‘आमने-सामने’

0

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलीस आणि दरोडेखोर आमने सामने; काही पळाले तर ८ जणांना अटक

डोंगरामध्ये पळून गेलेल्या अज्ञातांचा पोलीस शोध घेत आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडेखोरांना फिल्मीस्टाईल अडवले. त्यापैकी काही जण गाडीतून उतरले तर काही जण डोंगराच्या दिशेने पळाले. दरोडेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली असून आत्तापर्यंत आठ दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, डोंगरामध्ये पळून गेलेल्या अज्ञातांचा पोलीस शोध घेत आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार आणि दरोडेखोर हे मुंबईहून पुण्याचे दिशेने पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला, दरोडेखोर दोन गाड्यांमध्ये होते. ते उर्से टोल नाका येथे येताच त्यांना गाडीतून खाली उतरण्यास पोलिसांनी सांगितले. पैकी एका गाडीतील पाच जण खाली उतरले तर इतर दरोडेखोर पोलिसांना बघून पळण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता यात दरोडेखोरांच्या गाडीचा डॅश लागल्याने पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.