मारुंजी येथे अडीच किलो गांजासह एकास अटक

0

पिंपरी : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी दुपारी सव्वातीन वाजता सरकार चौक, मारुंजी येथे करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीकडून 65 हजार 775 रुपयांचा 2.631 किलो गांजा जप्त केला आहे.

मंगेश सहदेव गायकी (रा. सरकार चौक, मारुंजी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गायकी याने विक्रीसाठी गांजा आणल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा मारून गांजा जप्त केला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सोन्या बापू देशमुख व त्यांच्या पथकाने केली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.