युपीमध्ये जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारणार 

योगी आदित्यनाथ यांची घोषणा : टिकाकारांना दिले उत्तर 

0

मुंबई ः ”आम्ही काहीही कुठेही घेऊ जाणार नाही. मुंबईतील फिल्मसिटी मुंबईतच काम करणार आहे. नव्या वातावरणानुसार आणि नव्या गरजांनुसार उत्तरप्रदेशमध्ये फिल्मीसिटी उभारणार आहोत”, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगत आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांना आणि मनसेला टोला लगावला आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आदित्यनाथ म्हणाले की, ”उत्तरप्रदेशमध्ये जागतिक दर्जाचे फिल्मसिटी उभं करत आहोत. त्यासाठी अभिनेते, दिग्दर्शक आणि इतर कलाकार यांच्याशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळी यमुना प्राधिकरणाजवळ ही फिल्मसिटी उभी होणार आहे. जेवर विमानतळाशेजारील १००० हेक्टरपेक्षा जास्त जागेवर ही फिल्म सिटी उभी केली जाणार आहे.”

योगी आदित्यनाथ यांच्यावर काॅंग्रेस, शिवसेना आणि मनसे यांनी फिल्मसिटी हलविणार, या मुद्द्यावरून टीका केली होती. मात्र, आजच्या मुंबई दौऱ्यानंतर आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये जागतिक दर्जाचे फिल्मसिटी उभारणार असल्याची अधिकृत घोषण केली आणि टीका करणाऱ्यांना शांत बसविले.

Leave A Reply

Your email address will not be published.