नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी १० खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना कार्यकाळ संपेपर्यंत निलंबित राहावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे. घोषणाबाजी करणे आणि कागद फेकणे या कारणांसाठी दहा खासदारांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त असल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे एखादा खासदार जर दुसऱ्यांदा गोंधळ घालताना दिसला तर त्याला पूर्ण टर्मसाठी निलंबित करण्यात यावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. लोकसभा अध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी 10 खासदारांचं निलंबन झालं आहे.
हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांसमोर येऊन त्यांच्यावर कागद फेकत होते.
या १० खासदारांचं निलंबन
मणिकम टागोर
दिन कुरिकोसे
हेबी एडन
एस. ज्योतिमणी
रौनित बिट्टू
गुरजित औजला
टीएन प्रथपन
व्ही. वैथिलिंगम
सप्तगिरी शंकर
दीपक बाज