सराईत गुन्हेगार रिंकू चौहाण टोळीला मोका

0

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या 12 पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत अमर उर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण याच्यासह त्याच्या इतर 4 साथीदारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख अमर उर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण (33 रा. नेहरुनगर पिंपरी) टोळी सदस्य रोहित प्रविण धनवे (20 रा. महेशनगर पिंपरी), अक्षय आण्णा रणदिवे (29 रा. खंडे वस्ती, भोसरी), साहिल सुधीर धनवे (20 रा. प्रगती शाळेजळ, महेशनगर, पिंपरी), सोन्या रणदिवे (रा. नेहरुनगर, पिंपरी) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख अमर उर्फ रिंकू चौहाण याने साथीदारांसह तसेच काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन टोळी तयार करुन आर्थिक फायद्यासाठी तसेच टोळीच्या वर्चस्व व दहशत पसरवण्यासाठी गुन्हे केले आहेत.

रिंकू चौहाण याने पिंपरी, बंडगार्डन, निगडी, भोसरी, येरवडा, विश्रांतवाडी, समर्थ,सहकारनगर, एमआयडीसी भोसरी, विमानतळ, चिंचवड, चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न कट रचणे, पुरावा नष्ट करणे, अपहरण, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खंडणी, दुखापत करणे, वाहनांची तोडफोड करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत.

या टोळीने 38 एकत्र गुन्हे केले असून स्वतंत्रपणे 12 गंभीर गुन्ह्यांसह 32 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात आयपीसी 397, 394, 384, 323 504, 506, 143, 147, 149, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यात मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी पोलीस आयुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर केला. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.सी.बी. बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा सहायक पोलीस फौजदार अनिल गायकवाड, ओंकार बंड, दत्ताजी कौठेकर यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.