कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका : संजय राऊत

0

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत यावर आपली भूमिका मांडली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राजस्थानमधील उदयपूरमध्ये ज्या प्रकारे हत्याकांड झालं त्याचाही उल्लेख केला आहे. राऊत यांच्या ट्विटनंतर आता पुणे पोलीस काय पावलं उचलणार हे पाहावं लागेल.

संजय राऊत म्हणाले, ब्राह्मण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

ब्राम्हण महासंघाचे नेते,
कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे..उदयपूर प्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसानी @ANANDDA62133632
आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.@PunePolice4U pic.twitter.com/aG3ONI0guZ

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 5, 2022

भाजपच्या माजी वादग्रस्त प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरुन पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून इशारा देण्यात आला असून केंद्रीय यंत्रणेनी यावेळी दवे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा हिने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तसेच तिच्या समर्थनात पोस्ट केल्यानंतर उदयपूर येथे दोन तरुणांनी कन्हैय्या लाल नावाच्या एका टेलरची निर्घृण हत्या केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.