मुंबई : देशात, राज्यात गेल्या काही दिवसांपासून इंधन दर मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आज या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्राेलचे दर ९०.३४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.४७ रुपये आहेत.
राज्यात शु्क्रवारी नांदेडमध्ये सर्वाधिक ९२.६९ रुपये प्रति लिटर एवढे पेट्राेलचे दर झाले आहेत, तर अनेक शहरांमध्ये पेट्राेलचे दर ९० रुपयांपेक्षा जास्त असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या काही दिवसात पुन्हा इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या महिनाभरात सुमारे १० ते १२ डाॅलर्स प्रति बॅरलने वाढले आहेत, परंतु ओपेककडून उत्पादनात करण्यात आलेली घट, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यामुळे कच्चे तेल महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे.