मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. त्यांनी समोर उभे राहावे : राणे

0
चिपळूण : मी कोणताही गुन्हा केला नाही, माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे मला माहिती नाही.  उद्धव ठाकरे वादग्रस्त बोलतात, तेव्हा गुन्हा दाखल का झाला नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
‘माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझी बदनामी करायला घेतली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, आमचेही केंद्रात सरकार आहे. राज्य सरकारची उडी किती लांब जाते ते पाहूया.’ अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
‘मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. त्यांनी समोर उभे राहावे. नोटीस आणि पत्रात यात फरक आहे. ते राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत का आदेश काढायला? कमिशनर यांनी वक्तव्य तपासून पाहावे. मी तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. दोन दगड मारून गेले हा पुरुषार्थ नाही. ते जे काय करत आहेत ते करू दे. तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही.
नाशिक पोलीस आयुक्त यांनी नारायण राणे यांना अटक करावी असे आदेश काढले. तसेच नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटताहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.