मुंबई पोलिसांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस

0

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या घोटाळ्याबाबतची माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली होती. राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी समोर आणला होता. न्यायालयाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ऑफिशिअल माहिती लीक कशी झाली याचा एफआयआर दाखल झाला आणि मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. मला विरोधी पक्षनेता असल्याने माहितीचा स्त्रोत विचारला जावू शकत नाही. मला काल CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली असून सायबर पोलीस ठाण्यात बोलावलं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

राज्यातील मंत्र्यांनी ही माहिती बाहेर दिली याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत.
पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी मी जाणार आणि त्यांना सहकार्य करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यासोबतच मी परवा राज्य सरकारने केलेल्या षडयंत्राचा मी भांडाफोड केल्याने त्यांना काही सूचत नसल्याने त्यांनी नोटीस पाठवली असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, दाऊदसोबत व्यवहार करणारे तुरूंगात जाऊनही अद्याप महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत याची मला खंत असल्याचं म्हणत पुन्हा फडणवीसांनी नवाब मलिक यांच्यावरून सरकारवर टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.