काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दररोज दोन हजारच्या वरती रुग्ण सापडत आहेत . महापालिकेचे हॉस्पिटल व सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरवठाचा तुटवडा व रेमडेसिवीर इंजेक्शनचाही काळाबाजार सुरू आहे . मात्र , भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी राज्य सरकारकडे बोट दाखवत आहेत . पालिकेत भाजपची सत्ता आहे.ते पालिका प्रशासनाला आदेश देण्याचे सोडन थेट राज्य सरकारने राज्य सरकारकडे बोट दाखविण्यापेक्षा सत्ताधा … लक्ष घालण्याची बतावणी करताना दिसत आहेत . सध्याच्या परिस्थितीत महापालिका प्रशासन आणि कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन कमी पडत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे . त्यामुळे रुग्ण खाजगी कोविड रुग्णालयांकडे धाव घेत आहेत .
रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज वाढल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे . त्यामुळे ऑक्सिजन बेड व आयसीयू बेड मिळविण्यासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे . त्याबाबत महापालिका प्रशासन व सत्ताधारी अद्यापही गंभीर नसल्याचे दिसत आहे . सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे . शहरात मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे . यासाठी आयुक्तांनी आपल्या अधिकारात निर्णय घ्यावेत असे नाना काटे यांनी म्हटले आहे .