विमानतळावर मोठी कारवाई, 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

0

मुंबई : विमानतळावर मोठी कारवाई करत कस्टमच्या पथकाने 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-610 वरून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क पथकाने 9.8 कोटी रुपयांचे 980 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

यापूर्वी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी देखील मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने 490 ग्रॅम कोकेन घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला पकडले होते. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 4.9 कोटी रुपये होती. महिला प्रवाशाने तिच्या सँडलमध्ये बनवलेल्या एका खास छिद्रात कोकेन लपवून आणले होते.

कोकेन इतर पदार्थांसोबत मिसळून ते ब्लॅक कोकेन बनवले जाते. जेणेकरून धातूच्या साच्याच्या स्वरूपात किंवा अन्य काही स्वरूपात त्याची तस्करी करता येते आणि अमली पदार्थ विरोधी एजन्सीपासून संरक्षण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.