वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या लॉजवर छापा

0

निगडी : खुलेआम वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या लॉजवर छापा मारुन पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली आहे. दुर्गानगर आणि थरमॅक्स चौकाजवळील अशा दोन  लॉजवर कारवाई केली.

पहिली कारवाई दुर्गानगर चौकातील मिलन लॉजिंग अँड बोर्डिंग या लॉजमध्ये करण्यात आली. मॅनेजर प्रदीप माधवा पुजारी (32, रा. निगडी), चालक मालक शशांक शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप याला अटक केली असून त्याच्याकडून 63 हजार 675 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमध्ये चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

तर, दुसरी कारवाई थरमॅक्स चौक ते दुर्गा चौक दरम्यान असलेल्या साईदीप लॉजमध्ये करण्यात आली. दीपेन दिनेश शेट्टी (30, रा. पुनावळे), विवेक नोबराज विश्वकर्मा (25, रा. चिंचवड. मूळ रा. नेपाळ) या दोघांना अटक केली आहे. आरोपी दोघेजण एका महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यात एका महिलेची सुटका करत 14 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.