मुंबई ः ”राहूल गांधी आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर पक्ष संघटित होतो आहे. त्यांनी जीवनात अनेक दुःख पाहिले आहेत, तसेच जे आघात झाले त्यातूनही ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहूल गांधींचं नेतृत्व समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं”, असं मत बाळासाहेब थोरात यांनी मांडले.
काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीवरून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये चांगलीच धुसमूस सुरू झाली आहे. यशोमती ठाकूर यांच्यानंतर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिलेले आहे.
पुढील काळात राहूल गांधीच पक्षातं नेतृत्व समर्थपणे करणार आहेत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. राहूल गांधींच्या विरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात, असंही थोरात यांनी सांगितले.