शेयर बाजार ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी

0

नवी दिल्ली : सध्या शेयर बाजार नवीन विक्रम बनवत आहे. सेन्सेक्स 60 हजाराचा ऐतिहासिक स्तर (Sensex Historical High) गाठला आहे. मागील सात महिन्यात सुमारे 28 कंपन्यांनी आयपीओमधून सुमारे 42 हजार कोटी रुपये जमवले (Stock Market) आहेत.

यामध्ये स्टार्टअप कंपनी झोमॅटो (Zomato), तत्व चिंतन फार्मा (Tattva Chintan Pharma), ग्लेनमार्क लाईफ सायन्स (Glenmark Life science), सालासार टेक्नॉलॉजीस (Salasar Technologies), पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीस (Paras Defence and Space Technologies) सारख्या आयपीओंचा समावेश आहे. (Stock Market)

आगामी दिवसात अनेक आकर्षक आयपीओ रांगेत असणार आहेत. स्वस्त हॉटेल उपलब्ध करून देणारी स्टार्टअप कंपनी ओयो हॉटेल्स अँड रूम्स (OYO IPO) ने काही दिवसांपूर्वी बाजार नियामक सेबी (Securities and Exchange Board of India / SEBI) कडे आयपीओचे कागदपत्र जमा केले आहेत. ओयो हॉटेल्स अँड रूम्स कंपनी एक अरब डॉलरपेक्षा जास्तचे आयपीओ आणण्याची तयारी करत आहे.

याशिवाय आगामी काळात आपल्याला पेटीएम (Paytm IPO), Nykaa, ओला (Ola IPO) सारख्या स्टार्टअप कंपन्यांचे आयपीओ सुद्धा पहायला मिळतील. या वर्षाच्या उर्वरित भागात आपण अशाप्रकारचे जवळपास 70 कंपन्यांचे आयपीओ बाजारात तरंग निर्माण करताना पाहू शकतो.

हे आयपीओ कंपन्यांना पैसे जमा करण्यात मदत करतात, तसेच किरकोळ गुंतवणुकदारांना सुद्धा मोठी कमाई करण्याची संधी देतात. मागील दिवसात सादर झालेले आयपीओंचे आकडे हे सिद्ध करतात.

तत्व चिंतन फार्मा, जीआर इन्फ्रा (GR Infraprojects), केमकॉन स्पेशियलिटी केमिकल्स (Chemcon Specialty Chemicals), हॅप्पिएस्ट माईंड्स टेक्नॉलॉजीस (Happiest Minds Technologies), रूट मोबाईल (Route Mobile), क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Clean Science &Technology) सारख्या आयपीओंनी 100 टक्के रिटर्नचा स्तर मिळवला आहे. या आयपीओंनी गुंतवणुकदारांना दोन ते तीन पट रिटर्न दिला आहे.

किरकोळ गुंतवणुकदार कशाप्रकारे आयपीओ बाजारातून पैसा कमावत आहेत, याची झलक डिमॅट अकाऊंट उघडण्यात आलेल्या तेजीवरून समजते. सेबीचे आकडे सांगतात की, एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 च्या दरम्यान एक कोटीपेक्षा जास्त नवीन डिमॅट अकाऊंट उघडले.
ही खाती सेकंडरी मार्केटमध्ये पैसे लावत आहेत आणि आयपीओमध्ये सुद्धा रस दाखवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.