सचिन वाझेची थेट तळोजा जेल मध्ये चौकशी

0

मुंबई : कथित 100 कोटी वसूलीच्या आरोपांप्रकरणी ईडीच्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझेची चौकशी केली. ईडीने माजी गृहमंत्र्यांच्या दोन सचिवांना अटक केली आहे. त्या दोन्ही सचिवांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर आता ईडीकडून सचिन वाझे याची चौकशी सुरु आहे.

ईडीने याआधी अनिल देशमुखांच्या दोन सचिवांची चौकशी केली आहे. तसेच काही बार मालकांची देखील चौकशी केली आहे. काही बारमालकांनी ईडी अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात सचिन वाझेंना पैसे दिल्याचे कबूल केले आहे. तसेच देशमुखांचे दोन्ही सचिव वसूलीच्या रकमेबाबत ठरवायचे, असा युक्तीवाद ईडीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात केला होता. त्यामुळे याच माहितीच्या आधारावर ईडी अधिकारी सचिन वाझेची चौकशी करत होते. ईडी अधिकाऱ्यांनी सचिन वाझेची जवळपास सलग सहा तास चौकशी केली.

ईडी अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला परमबीर सिंग यांनी केलेल्या लेटरबॉम्ब विषयी विचारलं. या लेटरबॉम्बमध्ये अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर सचिन वाझेची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तसेच 100 कोटी वसुलीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारले. तसेच बार मालक आणि इतर साक्षीदार यांनी दिलेल्या जाबाबाविषयी विचारण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.