सरकारची दादागिरी मोडीत काढू ः पडळकर 

0

मुंबई ः ”हे सरकार झोपलं आहे आणि धनगर समाजाचं श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जागं करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पाठीमागे १६ मागण्या लिहिलेला बोर्ड मोडला आणि ढोल वाजविणापासून रोखलं. आमची ही लोककला आहे. कारण नसताना पोलिसांनी सरकारच्या सुचनेसुनार रोखलं आहे. मी सरकारचा निषेध करतो”, अशा आक्रमक भाषेत भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निषाणा साधला आहे.

पडळकर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ”या सरकारन धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल एकही बैठक घेतली नाही. मागील फडणवीस सरकारने एक हजार कोंटीपैकी ५०० कोटींची तरदूर केली होती. त्यातला एकही रुपया या सरकारने धनगर समाजाला दिलेला नाही. विरोधक असताना हेच लोक नागपुरात पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी घेऊन आंदोलन करताना दिसली. आता मात्र धनगरांचा तिरस्कार करत आहेत.”

”धनगरांच्या अभिमान आणि भावनेशी हे सरकार खेळत आहे. या गोष्टींमुळे मंत्र्यांना गावागावात फिरणे मुश्कील होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करू असं वाटत असेल, पण आम्ही मोडीत काढू”, असेही पडळकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.