सरपंचाची निवड ही सदस्यातूनच होईल : मुश्रीफ

0

कोल्हापूर : सरपंचाची निवड ही सदस्यातूनच करण्यात येणार आहे असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. त्यामुळे विकास होत नसल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला.


हसन मुश्रीफ हे एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. कोरोना आणि लॉक डाऊन यामुळे डिसेंबर अखेर 14 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले गेले. आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

भाजप काळातील लोकनियुक्त सरपंच निवडला जात होता. ही पद्धत चुकीची आणि लोकशाही विरोधी होती. निवडच करायची तर मग पंतप्रधानांपासून ते सरपंचापर्यंत सर्वांचीच नियुक्त लोकांमधून व्हावी. एकट्या सरपंचाची कशाला? असा सवाल करतानाच फक्त ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत हा प्रयोग राबवण्यात अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.