10 घरफोड्या करणारा सराईत अटकेत; 7.80 लाखांचे दागिने जप्त

0

पिंपरी : चाकण, आळंदी, दिघी परिसरातील 10 घरफोड्या उघडकीस आणून, 7 लाख 80 हजार रुपये सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस, गुन्हे शाखा युनिट 3 च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे (50) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण, आळंदी, दिघी परिसरात घरफोड्या करणारा सचिन काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. व तो मागील एक महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असल्याची माहिती युनिट 3 च्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने आरोपी काळेला ताब्यात घेतले. सखोल तपासाअंती दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीकडून 7 लाख 80 हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर गुन्हे शाखा युनिट 3, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषीकेश भोसुरे, अनिल लांडे, महेश भालधिम, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, रामदास मेरगळ, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.