नवी दिल्ली : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून IT क्षेत्रातील कर्मचारीघरून काम करत आहेत. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांनाकुटुंबासह वेळ घालवत काम करता येत आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात भल्याभल्या कंपन्यांना आर्थिक तोट्याचासामना करावा लागला असताना IT कंपन्या मात्र जोमात होत्या. TCS, Infosys, Wipro अशा काही IT कंपन्या कोरोनाकाळातहीनफ्यात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारातही बऱ्याच कंपन्यांनी वाढ केली. असं असतानाही या वर्षीच्या शेवट्पर्यंत तब्बल10 लाख IT कर्मचारी त्यांचे जॉब सोडतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षीच्या Attrition Rate (कर्मचारी जॉब सोडूनजाणे) मध्येही दरवर्षीपेक्षा अधिक वाढ होणार आहे असा अंदाज लावण्यात येत आहे.
एका ताज्या अहवालात असं समोर आलं आहे की 2021 मध्ये भारतातील IT सेक्टरमध्ये Attrition Rate हा दुप्पट होईल. याचा अर्थअसा की सुमारे 10 लाख IT कर्मचारी त्यांचे जॉब सोडतील. मात्र या मागचं नक्की कारण काय? हे जाणून घेऊया.
” कोरोनानंतर एकीकडे IT कंपन्या पुन्हा ऑफिसेस सुरु करण्याच्या विचारात आहेत. तसंच कर्मचाऱ्यांसाठी नवनवीन मॉडेल्स आणूनत्यांना पुन्हा कामावर बोलावण्यास उत्सुक आहेत. मोठे प्रोजेक्ट्स घेण्यासही उत्सुक आहेत. मात्र यंदा Attrition Rate ही तब्बल 22 टक्के ते 23 टक्क्यांच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे या कंपन्यांना मोठे प्रोजेक्ट्स हाताळण्यात अडचणी येऊ शकतात” असं काहीतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोरोनामुळे IT कर्मचारी घरून काम करत होते. मात्र आता अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करून कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्येबोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही कर्मचारी अशा कंपनीच्या शोधात असू शकतात ज्या कंपन्या वर्क फ्रॉम होमला परवानगीदेतील. म्हणून असे कर्मचारी कंपनीसोडून जाऊ शकतात.
IT सेक्टरमध्ये इतर क्षेत्रांच्या तुलनेत पगार हे चांगले असतात आणि कामानुसार सतत पगारवाढही होत असते यात शंका नाही. मात्रकाही फ्रेशर्सना म्हणावा तसा किंवा अपेक्षेपेक्षा कमी पगार मिळतो. म्हणूनच अधिक पगार मिळवण्याच्या हेतूनं कर्मचारी जॉब्स सोडूनजाऊ शकतात.
गेल्या दीड वर्षांपासून वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे अनेक कंपन्या आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद संभवतात. काही कंपन्यांच्याआणि सहकाऱ्यांच्या विचारांशी दुमत झाल्यामुळे काही कर्मचारी जॉब सोडून जाऊ शकतात.
एकूणच काय तर हा वाढणारा Attrition Rate कमी करायचा असेल तर कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना एकमेकांशी जुळवून घेणं फारमहत्त्वाचं असणार आहे. तसंच कंपन्यांना येणाऱ्या काळातील वर्किंग मॉडेल्स कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेनुसार ठेवणं महत्त्वाचं असणार आहे.