100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल

दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची घोषणा

0

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार करणार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे. तब्बल एक कोटी 62 लाख 42 हजार शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे.

त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (4 ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

याशिवाय पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येणार आहेत तर नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

– शिधापत्रिकाधारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ. रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत देणार – (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)

– आपत्ती व्यवस्थापनातीलप्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार – (मदत व पुनर्वसन विभाग)

– पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार – (गृह विभाग)

– नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता – (नगर विकास विभाग)

– भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता – (जलसंपदा विभाग)

– उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. 8 दुष्काळी तालुक्यांना फायदा – (जलसंपदा विभाग)

Leave A Reply

Your email address will not be published.