गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यात 10 हजार नवे कोरोना रुग्ण

0

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात शनिवारी १० हजाराच्या जवळपास नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

पुण्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ झालेली आहे. ही वाढ वर्षातली सर्वांत जास्त आहे.

शनिवारी पुणे शहरात 5720 नवीन रुग्ण आढळले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 2905 नवीन रुग्ण आढळले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी ९ हजारांवर नवे कोरोनाबाधित आढळले आहे. तर जवळपास ६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरात शुक्रवारी ४ हजार ६५३ तर पिंपरीत २ हजार ४६३ रुग्णांची भर पडली होती. तसेच पुणे शहरात ३ हजार ३३७ तर पिंपरीत १ हजार ५०७ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील शुक्रवारी एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजार ९७ झाली आहे.

पुणे शहरातील शुक्रवारपर्यंतची कोरोना रुग्णसंख्या ३७ हजार १२६ झाली आहे. आणि पिंपरीत १६ हजार ३७९ इतकी आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ७३ हजार ७१४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ५ लाख ५१ हजार ५०८ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.