पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 11 सहाय्यक निरीक्षकांना निरीक्षकपदी पदोन्नती

0

पिंपरी : राज्य पोलीस दलातील 453 सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देत बदली  करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील 11 जणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी बुधवारी (दि.2) काढले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस निरीक्षकांच्या मंजूर पदापेक्षा जास्तीचे निरीक्षक सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे निरीक्षक दर्जाचे काही अधिकारी अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात अडचणी निर्माण होत आहेत.

पदोन्नतीने बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे

1. सुरेखा मोतीराम चव्हाण (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

2. दिपाली बाळासाहेब मोटे (पिंपरी चिंचवड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)

3. गजानन महादेव बनसोडे  (पिंपरी चिंचवड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)

4. स्वाती रामनाथ खेडकर  (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

5.अविनाश एकनाथ पवार  (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

6. गोकुळ रामदास महाजन (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)

7. राजू रामचंद्र ठुबल (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

8. सुनिल वसंत बिले (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

9. विनोद बिभिषण शिंदे  (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

10. विजय पांडुरंग गरुड (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

11. शाहिद सय्यद पठाण  (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

Leave A Reply

Your email address will not be published.