नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात त्यांच्यासाठी 12 कोटींची मर्सडीज आलेली आहे. मोदी यापूर्वी दोनवेळा मर्सिडीज-मेबॅक एस 650 (Mercedes-Maybach S650) या गाडीतून फिरताना दिसले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी नुकतेच हैदराबाद हाऊसमध्ये गेले होते. त्यावेळी ते त्यांच्या नवीन मेबॅक 650 गाडीमध्ये पहिल्यांदा दिसले. त्यानंतर हे वाहन पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या ताफ्यात दिसले.
काय आहेत वैशिष्ट? -Mercedes-Maybach S650 Guard हे नवीन मॉडेल आहे. आतापर्यंत लाँच झालेल्या कारमधील सर्वोच्च संरक्षण असणारे हे मॉडेल आहे. एका अहवालानुसार, Mercedes-Maybach ने गेल्या वर्षी भारतात S600 Guard लाँच केले होते, ज्याची किंमत 10.5 कोटी. तसेच आता या S650 मॉडेलची किंमत 12 कोटींपेक्षा जास्त असू शकते. तसेच या गाडीचा वेग हा १६० किमी प्रतितास इतका आहे. कारमध्ये आलिशान इंटीरियर आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं वाहन -भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी जबाबदारी असणारे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षेच्या गरजा ओळखून संरक्षण देत असलेल्या व्यक्तींना नवीन वाहनाची गरज आहे की नाही हे ठरवत असते. या वाहनाचा कमाल वेग १६० किमी प्रतितास इतका मर्यादित आहे. या वाहनाच्या खिडकीचा आतील भाग पॉली कार्बोनेटचा असून कारचा खालचा भाग कोणत्याही प्रकारच्या स्फोटांपासून सुरक्षित ठेवतो. त्यामुळे S650 गार्ड बॉडी आणि खिडक्या हल्ला झाल्यास बुलेटचा देखील सामना करू शकतात. तसेच या वाहनाने प्रवास करणारे व्यक्ती २ मीटर अंतरावर होणाऱ्या स्फोटापासून सुरक्षित असतात. वायू हल्ला झाल्यास त्यापासून देखील संरक्षण मिळतं. बोईंग त्यांच्या AH-64 अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टरसाठी जी सामग्री वापरते त्याच सामग्रीपासून र्सिडीज-मेबॅक S650 गार्डची इंधन टाकी बनवली आहे. त्यामुळे उष्णतेमुळे तयार होणारी छिद्रे आपोआप सील करण्यास मदत करते.दरम्यान, मोदी गुजराते पंतप्रधान असताना त्यांनी बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये प्रवास केला होता. तसेच 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी BMW 7 सीरीज हाय-सिक्युरिटी वाहनाने प्रवास केला होता.