बालेवाडीत स्लॅब कोसळून १२ जण जखमी

0

पुणे : पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीस्लॅब कोसळला. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची आणि अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्याआहेत. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी १२ जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेलं असल्याचं स्थानिक लोक सांगत आहेत.

ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.