बिल्डरच्या ऑफिसमधून 12 हजार जिलेटिनच्या कांड्या आणि 3008 डेटोनेटर जप्त

0

मुंबई : ठाण्यात एका बिल्डरच्या ऑफिसमधून 12 हजार जिलेटिनच्या कांड्या आणि 3008 डेटोनेटर जप्त करण्यात आले आहे. ठाणे क्राइम ब्रँचने मित्तल एंटरप्रायजेस नावाच्या कंपनीच्या कार्यालयात छापा मारून ही जप्ती केली आहेत.

कंपनीच्या सेफ हाऊसच्या कार्यालयात स्फोटके ठेवली होती. काला रात्री दिड वाजता छापा टाकण्यात आला. स्फोटकांचा वापर बिल्डिंगच्या कामात होतो, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात साठा केल्याने त्याची चौकशी होत आहे. भिवंडी कोर्टाने आरोपीला 22 मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी सांगितले की, ठाणे पोलीसांच्या गुन्हा शाखा एक ने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर चिंचोटी रोडवरील एका कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी 63 बॉक्समध्ये जिलेटिनच्या 12,000 कांड्या आणि चार बॉक्समध्ये सापडलेले 3,008 डिटोनेटर्सची किंमत 2,42,600 रुपये आहे. विना मंजूरी अशा प्रकारचे साहित्य ठेवल्याने मालक गुरुनाथ काशीनाथ म्हात्रे यांना भारतीय दंड विधान आणि स्फोटके कायद्यांतर्गत अटक केली आहे.

अधिकार्‍याने सांगितले की, भिवंडीचे भोईवाडा पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस हा शोध घेत आहेत की, जिलेटिनच्या कांड्या आणि स्फोटके कुठून आणली गेली आहेत आणि हे साहित्य येथे का ठेवले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.