पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1276 ‘कोरोना’चे रुग्ण

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे 1276 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात रुग्ण वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या साडेसहा हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 10 हजार 364 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1276 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 86 हजार 213 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 230 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 6694 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 425 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6269 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.