चिंचवड : चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्हेकरवाडी येथे दोघांनी 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 25) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी मधील गुरुद्वारा परिसरात दोघांनी मिळून 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. परिसरात दहशतपसरविण्याच्या उद्देशाने दोघांनी वाहनांना लक्ष्य केले. गुरुद्वारा परिसरातच निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील पाच ते सहा वाहनांचीआरोपींनी तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तपास करत दोघांना ताब्यात घेतले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
सांगवीतही तोडफोड
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील तोडफोड झाली. एका व्यक्तीने बुधवारी मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांचीतोडफोड केली. यामध्ये पाच ते सहा वाहनांचे नुकसान झाले आहे.