पुणे शहरात 1504 नवीन रुग्ण, सात जणांचा मृत्यू

0

पुणे : गेली 24 तासात पुणे शहरात तब्बल 1504 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 675  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज एका दिवसात कोरोनाबाधितांनी 1500 चा टप्पा ओलांडला आहे.

आज कोरोनाबाधित 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  357  रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून 739 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 13 हजार 25 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 8541 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4917 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पुणे कोरोना अपडेट : गुरुवार, ११ मार्च, २०२१

◆ उपचार सुरु : ८,५४१
◆ नवे रुग्ण : १,५०४ (२,१३,०२५)
◆ डिस्चार्ज : ६७५ (१,९९,५६७)
◆ चाचण्या : ८,५५३ (१२,२०,९००)
◆ मृत्यू : ७ (४,९१७)#PuneFightsCorona#CoronaUpdatepic.twitter.com/0LaGjfOHzJ

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 11, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.