पुण्यात 3.75 कोटी रुपये किंमतीचा 1878 किलो गांजा जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

0
पुणे : अननस आणि जॅकफ्रूट फळांची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये खाली लपवून आणलेला गांजा महसूल गुप्तचर संचालनालयच्या पुणे प्रादेशिक युनिटने जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 3 कोटी 75 लाख रुपये किंमतीचा 1 हजार 878 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) पुणे-सोलापूर महार्गावर करण्यात आली. या कारवाईमध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय पुणे युनिटचा पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर आयशर ट्रक (टीएस 07 युए 7979) आणि एक कार (आरटीओ पासिंग नं. TS09 EP T/R 90) ही दोन संशयित वाहने आडवली. आयशर ट्रकची तपासणी केली असता टेम्पोमध्ये अननस आण जॅकफ्रूट होते. या फळांच्या खाली 40 पिशव्यांमध्ये गांजा लपवल्याचे आढळून आले.
अधिकाऱ्यांनी गांजा जप्त करुन आयशर टेम्पो मधील 2 आणि कारमधील 4 अशा एकूण 6 आरोपींना अटक केली.
विलास पवार, अभिषेक घावटे, विनोद राठोड, राजू गोंधवे, श्रीनिवास पवार आणि धरमराज शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत हा गांजा आंध्र प्रदेशातून आणण्यात आला असल्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.