मुंबई ः देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. मागील २४ तासांमध्ये संपूर्ण देशात १९ हजार ७८ नवे करोनाबाधीत आढळले आहेत. तर, २२ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. त्याशिवाय करोनामुळे २२४ रुग्णांचा मृत्यू झालेले आहेत. देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख ५ हजार ७८८ वर पोहचली आहे.
देशात सध्या २ लाख ५० हजार १८३ सक्रीय केसेस असून, ९९ लाख ६ हजार ३८७ जण आतापर्यंत करोनातून बरे झालेले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १ लाख ४९ हजार २१८ वर पोहचली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, कालच करोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यासाठी दिल्लीमध्ये तज्ज्ञांची महत्वाची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता मिळाल्यामुळे देशात लसीकरणाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आजपासून देशात ड्राय रन सुरूवात होणार आहे. पुणे, नागपूर, नंदुरबार आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हा ड्राय रन होणार आहे.