घराची खरेदी न करता पावणे दोन कोटींची फसवणूक

0

पिंपरी : घराचे खरेदीखत केले मात्र त्याचा कोणताही मोबदला न देता उलट घर बँकेकडे गहाण ठेऊन विक्रेत्याची तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक केली आहे. ही घटना सन 2017 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली.

लखमशी कांजीभाई पटेल (73, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 19) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैतन्य कालबाग (60, रा. अंधेरी, मुंबई), दीपक शिवशरण प्रजापती (46, रा. ओशिवरा मुंबई) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या मुलाची घर खरेदीच्या व्यवहारात फसवणूक केली आहे. फिर्यादी आणि त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या वाकड येथील घराचे खरेदीखत करण्याचा बहाणा केला. फिर्यादी यांच्या मुलाला खरेदीखत करून देण्यास आरोपींनी प्रवृत्त केले.

खरेदीखत करून घेऊन मुलाला कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता ते घर आरोपींनी आयसीआयसीआय बँकेकडे गहाण ठेवले. त्यावर दोन कोटींचे कर्ज घेऊन बेकायदेशीर बोजा निर्माण केला. यामध्ये फिर्यादी आणि त्यांच्या मुलाची आरोपींनी एक कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.