खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक पाणी सोडले

0

पुणे : सोमवारी सायंकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे खडकवासला धरण ९४ टक्के भरले आहे. धरण परिसरात पाऊस अजूनही सुरु असून धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मध्यरात्रीपासून धरणातून नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता धरणातून २ हजार ५६८ क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत असून नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील वडज धरण १०० टक्के भरले असून धरणातून ४ हजार ४९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आंद्रा धरण ८३ टक्के भरले आहे. चिल्हेवाडी धरण ७६ टक्के भरले असून धरणातून २ हजार ५२६ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. पानशेत धरण १२ जुलै १९६१ रोजी फुटले होते. आज पानशेत धरण ३६ टक्के भरले आहे. वरसगाव ३३ टक्के, टेमघर धरण २२ टक्के भरले असून पवना धरण३६ टक्के भरले आहे.

जिल्ह्यात शिरुर वगळता अन्य सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात वरसगाव १३७, टेमघर १७०, मुळशी१८६, पानशेत १४१, पवना १३६, आंद्रा ८२, पिंपळगाव जोगे ४९, माणिकडोह ९१, येडगाव ५१, वडज ५३, डिंभे ४४, विसापूर २, कळमोडी ११४, चासकमान ६९, भामा आसखेड ५५, गुंजवणी११५, कासारसाई ५३, निरा देवधर ११५, भाटघर ७३, वीर ११, नाझरे १०, उजनी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.