२४ तासांत २० हजार रूग्ण करोनाने संक्रमित 

0

नवी दिल्ली ः करोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार २१ रूग्ण नव्याने करोनाचे आढळले आहेत, तर २७९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. असे जरी असले तरी २१ हजार १३१ रूग्ण करोनामुक्त झालेले आहेत. सद्या देशात एकूण १ कोटी २ लाख ७ हजार ८७१ करोनाबाधितांची संख्या आहे.

आतापर्यंत देशामध्ये एक्टीव्ह करोना संक्रमित रुग्णांची संख्याही २ लाख ७७ हजार ३०१ आहे, तर ९७ लाख ८२ हजार ६६९ करोनामुक्त झालेले आहेत. करोनाने मृत्यू झालेल्यांची आतापर्यंतची आकडेवारी ही देशामध्ये १ लाख ४७ जाहर ९०१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
२७ डिसेंबरपर्यंत देशभरात १६,८८,१८५४ करोना चाचणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी ७ लाख १५ हजार ३९७ चाचण्या या काल तपासण्यात आल्या आहेत, असे आयसीएमआरने म्हटलेलं आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या करोनाच्या नव्या प्रजातींमुळे जगात आणखी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. लाॅकडाऊन तर काही ठिकाणी विलगीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तसेच काही ब्रिटन आणि आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवरदेखील बंदी घातलेली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.