मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी येत्या वर्षभरात २०३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
द्रुतगती मार्गावरुन जाताना वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहन चालवणे, अवजड वाहने एका मार्गिके तून दुसऱ्या मार्गिके त जाणे, अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे अपघातही मोठय़ा प्रमाणात होतात. याला आळा बसावा म्हणून वाहतूक पोलीस उपलब्ध मनुष्यबळाबरोबरच स्पीडगन, ब्रेथ अॅनलायझर, ई-चलान यंत्रणा अशा सुविधा असलेल्या अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल‘मार्फतही कारवाई करतात.
त्यामुळे एमएसआरडीसीने ‘महामार्ग वाहतूक व्यवस्थापना’अंतर्गत २०३ सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय साधारण सव्वावर्षांपूर्वी घेतला होता. या निविदा प्रक्रियेला आता गती दिली जात आहे.