पुणे : समर्थ पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्यांच्याकडून ३ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे.
आकाश भगवान त्रिभुवन (२५, रा. राधा चौक, बालेवाडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते व त्यांचे तपास पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना सराईत गुन्हेगार आकाश त्रिभुवन हा बारणे रोडवर थांबला असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले. अधिक तपास केला असता आणखी २ पिस्तुले व २ काडतुसे मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते व व त्यांचे सहकारी हवालदार संतोष काळे, पोलीस शिपाई हेमंत पेरणे, बाळासाहेब पाटोळे, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, शुभम देसाई, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सचिन पवार, निलेश साबळे, सुमित खुट्टे यांनी ही कामगिरी केली.