पिंपरी : हॉटेलचा व्यवसाय वाढविण्यासाठी पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून मदत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 32 लाख 92 हजारांची फसवणूक करणाऱ्यास पिंपरी–चिंचवड सायबर सेलने मीरा भाईंदर येथून अटक करण्यात आली.
जैद जाकीर खान (20, रा. मीरा भाईंदर, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एजन्सीची भरती असल्याचे सांगत घरातून पार्ट टाईमजॉब करण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीने सांगवी येथील एका व्यक्तीला संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने आमचा हॉटेलचा व्यवसायअसून तो वाढविण्यासाठी आम्ही जाहिरात करत आहोत. आपल्याला घरी बसून आमची मदत करता येईल, असे आरोपीने सांगितले.
त्यानंतर सांगवी येथील व्यक्तीला एक लिंक पाठवून टास्क देत लाईक आणि शेअर करण्यास सांगितले. सांगवी मधील व्यक्तीचाविश्वास संपादन करून त्यांना पाच हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. त्याबदल्यात आरोपीने सहा हजार 500 रुपये दिले. त्यानंतरआणखी टास्क देऊन गुंतवणूक करण्यास सांगत सांगवी येथील व्यक्तीकडून आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर 32 लाख 92 हजार563 रुपये घेत फसवणूक केली.
याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलकडून करण्यात आला. सायबर सेलने आरोपीचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला. त्यात आरोपी मीरा भाईंदर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला मीराभाईंदर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
आरोपी खान याच्या नावावर एक बँक खाते आहे. त्यावर 18 लाख रुपयांचा अधिकचा व्यवहार झाला आहे. इतर पैसे त्याने ओळखीच्यालोकांच्या नावाने बँक खाते सुरु करून त्यावरून केला आहे. जैद खान याच्या विरोधात इतर राज्यात दोन तक्रारी दाखल असल्याचेनिष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायकपोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, कृष्णा गवळी यांनी केली.