नवी दिल्ली : नवी स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूचा भयानक परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने उपाय योजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, दिल्ली आणि अन्य राज्यांतून ३५,००० नुमने गोळा करण्यात आले आहेत. या नमुन्यांची केंद्र सरकारच्या विविध प्रगत प्रयोगाशाळेत तपासणी करत आहे.
महाराष्ट्रात डेल्टा प्लस नवीन स्वरूपाचा विषाणू आढळल्याच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तावर बोलताना भारताच्या राष्ट्रीय प्रतिक्षमीकरण तांत्रिक सल्लागार समितीचे चेअरमन (एनटीएजीआय) प्रो.
स्थानिक निर्बंध लागू करून या विषाणूचा प्रसार रोखण्यावर नवीन रणनीतीवर भर देण्यात आला आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतही मोठ्या संख्येने डेल्टा प्लस विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. डेल्टा प्लस हा विषाणू बी १.६१७.२ या विषाणूचे नवीन स्वरूप असून हा विषाणू अधिक धोकायदायक आणि संसर्गजन्य आहे.
हा चिंताजनक विषाणू असल्याचे अमेरिकने म्हटले आहे, तर ब्रिटन सरकारलाही लॉकडाऊन चार आठवड्यांनी वाढवावा लागला.