बार मालकाकडून गोळा झालेले 4.70 कोटी अश्या प्रकारे सोपवले

0

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने ईडीकडे आणखी एक मोठा खुलासा केला आहे. सचिन वाझेच्या या खुलाशामुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सचिन वाझेने ईडीला सांगितले की, त्याने मुंबईतील बार मालकांकडून 4.70 कोटी रुपये रोख गोळा केले होते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या PS कडे सोपवले असल्याचा खुलासा वाझे याने केला आहे.

ईडीने (ED) हा सुद्धा दावा केला की मुंबई पोलीसांच्या क्राईम इन्टेलिजन्स युनिट (CIU) चे प्रमुख सचिन वाझे यांनी बार मालक आणि मॅनेजर्सला सांगितले की, हा पैसा नंबर 1 ला आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच आणि सामाजिक सेवा शाखेला जाईल. वाझेने एजन्सीला सांगितले की, त्यास पोलीस तपासाच्या अनेक प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून थेट निर्देश मिळत होते.

ईडीने मुंबईत स्पेशल प्रिव्हेन्शन मनी लॉन्ड्रिंग कोर्टात आपल्या रिमांड अर्जात आरोप केले होते. देशमुख यांचे पीए संजीव पालांडे आणि पीएस कुंदन शिंदे यांच्या कोठडीची मागणी केली होती, ज्यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. कोर्टाने दोघांना एक जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहे.

ईडीने आरोप केला की, वाझेने म्हटले आहे की, त्याने डिसेंबर 2020 पासून फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान बार मालकांकडून सुमारे 4.70 कोटी रुपये जमवले होते. ते अनिल देशमुख यांच्या निर्देशाने त्यांचा पीए कुंदन संभाजी शिंदेकडे जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 च्या महिन्यात दोन हप्त्यात सोपवले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.