कुपवाडा येथे 4 दहशतवाद्यांचा खात्मा

0

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शुक्रवारी सकाळी लष्कर आणि पोलिसांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मच्छल सेक्टरच्या काला जंगलात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी त्यांना नियंत्रण रेषेजवळ ढेर केले.

दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्यांची ओळख पटवली जात आहे. यापूर्वी 16 जून रोजी कुपवाड्यातच 5 दहशतवादी मारले गेले होते. याशिवाय 13 जून रोजी माछिल सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.