नरबळीसाठी चिखली येथून ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण; ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

पोलिसांकडून पती-पत्नी जेरबंद

0

पुणे : देश महासत्तेच्या दिशेने जाण्याच्या चर्चा होत असताना आपल्या इथे अद्याप अंधश्रद्धा ठासून भरलेली पाहायला मिळत आहे. यातुनच पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातून नरबळीसाठी ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अपहरण झालेल्या मुलीची सुखरुप सुटका झाली आणि पती-पत्नीला अटक करण्यात आली.  ही कामगिरी जुन्नर पोलिसांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, चिखली येथून एका चार वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. दरम्यान जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस दिलीप पवार, भरत मुठे, संतोष पठारे हे रात्रगस्त करीत होते. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस निरीक्षक यांनी रात्रगस्त अधिकारी दिलीप पवार यांना फोनद्वारे माहिती दिली की, पोलीस आयुक्तालय, पिपंरी चिंडवड, चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलगी बाबत माहिती मिळत आहे. ही माहिती उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, पद्माकर घनवट यांनी दिली.

या माहितीवरून जुन्नर पोलीस शहरातील महादेवनगर, जुने एस टी स्टॅन्डजवळ संतोष मनोहर चौगुले यांचे राहते घरासमोर जावुन घराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना त्या घरात एक महिला व एक पुरुष तसेच एक लहान मुलगी दिसली. त्यावेळी मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग, विकास जाधव, पोलीस निरीक्षक, जुन्नर पोलीस स्टेशन यांनी वॉट्सॲपवर पाठविलेला पिडीत मुलीचा फोटो पाहुन ती मुलगी तीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी सदर महिला व तीचे पती तसेच सदर अल्पवयीन मुलीस जुन्नर पोलीस स्टेशन येथे घेऊन आले. महिलेकडे अधिक विचारपुस केली असता, तीने पोलिसांना अगोदर उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागली.

त्यामुळे हा वेगळाच काहीतरी प्रकार असावा असा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी तीच्या पतीकडे अधिक तपास केला असता त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आणि त्या इसमाने कबुली दिली की, सदरची मुलगी हि त्याची पत्नी विमल संतोष चौगुले हिने चिखली, पुणे येथील बहिणीच्या घरा शेजारी राहणारी असून तिने ती पळवुन आणली होती. पोलिसांना यात नरबळीचा संशय असून त्या दृष्टीनेही तपास सुरु आहे. वेगळ्या पद्धतीने केलेगेलेल्या लहान मुलीच्या अपहरनाच्या या प्रकाराने पोलिसही अवाक झाले आहेत.

सदरची पिडीत मुलगी व महिला आरोपी विमल संतोष चौगुले (२८ वर्षे) व तीचा पती संतोष मनोहर चौगुले (४१ वर्षे, दोन्ही रा. महादेवनगर जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोलीस निरीक्षक इंगवले व दरोडा प्रतिबंधक पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांचे ताब्यात पुढील कायदेशिर
कारवाईकामी देण्यात आले.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे, मंदार जवळे, जुन्नरचे निरीक्षक विकास जाधव, दिलीप पवार, भरत मुठे, संतोष पठारे यांनी केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.