मुंबई ः क्रिकेटविश्वात देवाचं स्थान असलेल्या सचिन तेंडूलकर यांनी देशातील सहा राज्यांतील मुलांच्या उपचारासाठी निधी दिला आहे. अत्यंत गंभीर आजाराशी संघर्ष करणाऱ्या मुलांच्या कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे.
करोना महामारीत सचिनने महाराष्ट्र, आसाम, प. बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रेदशमधील शंभर मुलांना आर्थिक मदत केलेले आहे. एकम फाऊंडेशनकडून मुलांच्या आजारीची माहिती मिळवली आणि नंतर त्यांने त्या मुलांच्या आजारासाठी मदत केली.
सचिन हा युनिसेफचा गुडविल राजदूत आहे. सचिनचे फाऊंडेशन मध्यप्रदेशातील आदीवासींना आहार आणि शिक्षण देण्याचे काम करते. त्याच्या या मदतीमुळे आसाममधील २००० मुलांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर सचिनने वैद्यकीय मदतही केली आहे.