नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील ५ राज्याच्या निवडणुकीबाबत घोषणा केली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब , मणिपूर , गोवा आणि उत्तराखंड या राज्यात निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे.
उत्तर प्रदेश आणि मणिपूर निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून पंजाब, उत्तरखंड आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून निवडणूक घेण्यात येईल असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी स्पष्ट केलं
उत्तरप्रदेश 10 फेब्रुवारी पासून निवडणुकीचा पाहिला टप्पा, 14 फेब्रुवारी पासून तर दुसरा टप्पा तर 20 फेब्रुवारी ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल 23 फेब्रुवारी,27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च असे 7 टप्प्यात उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक होतील.
पंजाब उत्तरखंड आणि गोवा इथे 14 फेब्रुवारी ला मतदान होईल. मणिपूर ला 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च असे 2 टप्प्यात मतदान होईल. 10 मार्चला पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे.