‘इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन’ योजनेसाठी पुण्यात 50 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

0

पुणे – भारत सरकारने 2030 पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन’ घडविण्याची योजना आखली असून योजनेचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेच्या 50 वाहनतळांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभे करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ‘एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ यांच्याबरोबर करार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक स्वस्त इंधन खर्च, वाहनांची देखभाल कमी होणे इत्यादी बाबत मदत होणार आहे. ही वाहने सुरक्षित, किफायतशीर, पर्यावरणपूरक आहेत. पुण्यात दरवर्षी सरासरी अडीच ते पावणेतीन लाख नवीन वाहने रस्त्यावर येतात. त्यामध्ये सीएनजीवर चालणार्‍या वाहनांची संख्या 25 ते 26 हजार एवढी असते.

कच्च्या तेलाचे उत्पादन घटत असून, पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे येत्या काळात सीएनजीवरील वाहनांना पसंती वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे महापालिकेच्या विविध भागांतील मिळकतींवर सीएनजी पंपांची उभारणी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.