नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘या’ महिन्यापासून 50 हजार अनुदान मिळणार

0

मुंबई : नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यातील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार अस आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भातील मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अँपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अँप्लीकेशन द्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्तीप्रवण क्षेत्र आहेत, तिथे नागरिकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.