पुण्यात रेल्वे स्टेशनवर १ कोटी रुपयांचा चरस जप्त

हिमाचलप्रदेशमधील दोघांना केली अटक : एकूण ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस

0

पुणे : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बेंगलाेर, गाेवा आदी ठिकाणी वेगवेगळया रेव्ह पार्ट्यांचे आयाेजन केले जाते.  या पार्ट्यांत अंमली पदार्थचे सेवन करण्याकरिता चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या हिमाचल प्रदेशमधील दाेन जणांना पुणे रेल्वे पाेलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून १ काेटी ३ लाख ६४ हजार रुपये किंमतीचे ३४ किलाे ४०४ ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले आहे.

सदर ३४ किलाे चरसपैकी २२ किलाे चरस मुंबईला, पाच किलाे चरस गाेव्याला, पाच किलाे चरस बेंगलाेरला आणि दाेन किलाे चरस पुण्यात अशाप्रकारे माल पाठवला जाणार हाेता, अशी माहिती प्राथमिक चाैकशीत उघडकीस आल्याची माहिती पाेलीस अधिक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी दिली आहे.

ललित कुमार दयानंद शर्मा (वय-४९, रा. कुलु, हिमाचल प्रदेश), काैलसिंग रुपसिंग सिंग (४०, रा.कुलु, हिमाचल प्रदेश) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. लाेहमार्ग पाेलीस अधिक्षक पाटील यांना त्यांचे हिमाचल प्रदेश येथील बॅचमेट पाेलीस अधिक्षकांमार्फेत पुण्यात चरस विक्रीकरिता हिमाचल प्रदेश येथून दाेनजण येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पाेलिसांनी चार पथके तयार करून सलग सात दिवस ज्या-ज्या रेल्वे दिल्लीकडून पुण्यात येतात त्या प्रत्येक रेल्वेवर दराेडा पथकातील अधिकारी आणि ४५ पाेलीस अंमलदार यांचे पथक गस्त घालून लक्ष देत हाेते. १९ डिसेंबर राेजी रात्री पावणेअकरा वाजण्याचे सुमारास दाेन इसम पुणे रेल्वे स्टेशनजवळील वाडीया ब्रिजच्या खाली अंमली पदार्थ घेऊन आले असता त्यांना पाेलिसांना छापा टाकून जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून पाेलिसांनी ३४ किलाे चरस हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. अनाधिकृतपणे बेकायदेशीरात्या चरस त्यांच्या जवळ मिळून आल्याने त्यांच्यावर पुणे लाेहमार्ग पाेलीस ठाणे येथे एनडीपीसी एक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पाेलीस निरीक्षक सुरेशसिंग गाैड करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.