रत्नागिरी ः दापोलीतील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटवना घडली. ६ पैकी तिघांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील औंध येथे राहणारे आहेत. स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरुप बाहेर काढले आहे.
निहार चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे या सहा जणांसह १४ पर्यटक दापोली फिरण्यास आले होते, आज दुपारी फिरण्यासाठी आंजर्ले समुद्रकिनारी गेले आणि समुद्रात पोहोण्यास उतरले. पोहताना काही अंदाज न आल्याने सहाजण पाण्यात बुडाले.
ही घटना स्थानिकांच्या लक्षात येताच मदतीसाठी त्वरित धावले. त्यामुळे तिघे वाचले. मात्र, तिघा जणांंता बुडून मृत्यू झाला आहे. वाचलेल्या तिघांना दापोलीच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. तिघांना वाचविल्यानंतर बाकीच्या तिघांचा शोध घेतला असता काही वेळाने ते मृतावस्थेत आढळले. दोपाली पोलिसांनी याची नोंद करून घेतली आहे.