पिंपरी आयुक्तालयात ६५ पोलीस ‘पॅाझिटिव्ह’

0

पिंपरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कोरोनाने ६५ अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहेत. कोरोना झालेल्या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, पन्नाशीपुढील पोलिसांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना झालेल्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांची दररोज पोलिस आयुक्तालयातून फोनव्दारे विचारपूस केली जात आहे. कोरोना झालेल्यांना उपचारासाठी चार खासगी रुग्णालयात खास सोय करण्यात आली असून त्यात बिर्ला या तारांकित रुग्णालयाचाही समावेश आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८६३ पोलिस अधिकारी व अंमलदारांना कोरोना होऊन त्यातील पाचजणांचा बळी गेला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपले अधिकारी व कर्मचाऱ्यांची आगाऊ विशेष काळजी घेतली आहे. पन्नासीपूढील पोलिसांना जनतेशी संपर्क येईल, अशी ड्यूटी देणे त्यांनी बंद केले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.