पारगाव भीमा नदी पात्रात सापडलेल्या ७ मृतदेह प्रकरणाला वेगळेच वळण; ग्रामीण पोलिसांनी केली चौघांना अटक
पुणे : दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात सापडलेल्या ७ मृतदेहांबाबत नवीन माहिती समोर येत आहे. सुरुवातीला आत्महत्या प्रकरण असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या तपासात या सात जणांची आत्महत्या नसून पूर्ववैमन्याशातून हत्या झाल्याचा उलगडा केला आहे.
पोलिसांनी हत्या करणाऱ्या चार चुलत भावांना काल (मंगळवारी) रात्री उशिरा ताब्यात घेतले असून त्यांची एक महिला साथीदार अद्यापही फरार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
मोहन उत्तम पवार (४५) पत्नी संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (४०, दोघेही रा. खामगाव ता. गेवराई जि.बिड ), मुलगी राणी शाम फलवरे (२४), जावई शाम पंडीत फुलवरे (२८), नातू रितेश उर्फ भैया शाम फलवरे (०७), छोटु शाम फलवरे (०५) व कुष्णा शाम फलवरे (०३, सर्व रा. हातोला ता. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद) अशी एकूण ७ मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत भीमा नदी पात्रात स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बुधवारी (ता. १८) एका स्त्रीचा मृतदेह, शुक्रवारी (ता.२०) पुरुषाचा मृतदेह, शनिवारी (ता. २१) पुन्हा स्त्रीचा तर रविवारी (ता. २२) एका पुरुषाचा मृतदेह असे चार मृतदेह सापडले होते. तर आता याच कुटुंबातील तीन लहान मुलाचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात मंगळवारी (ता.२४) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आढळले आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गोयल यांनी यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीमेसाठी तैनात केली होती. आणि जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या ७ जणांच्या आत्महत्येचे गूढ उलघडले आहे. सुरुवातीला हे आत्महत्या प्रकरण असल्याचे सांगण्यात आले. मात्र पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला. त्यानंतर समोर वेगळीच माहिती आली. पूर्व वैमन्यासातून हत्याचा झाल्याचे समोर आले. या सातही हत्या चुलत भावांनी केल्याची पोलिसांनी उघड केली आहे. पोलिसांनी चारही संशयितांना अटक केली आहे. तर संशयितांची एक महिला साथीदार फरार आहे.
या ७ जणांच्या हत्ये मागे कुणाचा नेमका कुणाचा काय हेतू? याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन देण्यात येणार आहे.