पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर लग्न सभारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे, व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, कोचिंग क्लासेस आदी गोष्टी अटीशर्थींसह सुरु करण्यात येणार आहेत.
पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने त्याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तर पुण्यातील पीएमपी बससेवाही आजपासून 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सोमवारपासून पुण्यात काय सुरु?
दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील.
बसमध्ये 100 टक्के आसन क्षमतेने प्रवास, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई
मॉल, अभ्यासिका, ग्रंथालये 50 टक्के क्षमतेने सुरू
हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत टक्के क्षमतेने सुरू
हॉटेलमधील पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहणार
सार्वजनिक मैदाने पहाटे 5 ते सकाळी 9 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार.
लग्न समारंभास जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी
अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींनाच परवानगी
सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यास परवानगी
जिम, सलून, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार
शहरात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी
रात्री 10 नंतर संचारबंदी
मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार