रश्मी शुक्लांच्या विरोधात ७०० पानांचे आरोपपत्र; २० साक्षीदारांचे जबाब

0

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध  मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी ७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जवळपास २० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या काळात रश्मी शुक्ला यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले आहेत. ज्या वेळी नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आले, त्यावेळी ते आणि खडसे हे भाजपमध्ये होते. या प्रकरणावरून राज्यात मोठा गदरोळ उडाला होता. या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखविण्यात आले होते.

या आरोपपत्रात जवळपास २० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यात बहुतांश सर्व सरकारी कर्मचारी आहेत. या आरोपपत्रात सुमारे ६ सरकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबांचा समावेश असून, सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या सहा सरकारी कर्मचाऱ्यांपैकी एक त्यावेळी एसीएस होम एस कुमार आहेत. याशिवाय, त्यावेळेस एसआयडीमध्ये एक डीवायएसपीदेखील आहेत.

या आरोपपत्रात खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जबाबांचाही समावेश करण्यात आला आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नव्हते. त्या वेळी महाविकास आघाडी स्थापनेची प्रक्रिया सुरू होती. त्या काळात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोन तब्बल ६० दिवस टॅप करण्यात आला होता.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅप करून दोघांचे फोन टॅप करण्यासाठी ‘एसआयडी’कडून एसीएसच्या घरी पाठवलेल्या पत्रावर बनावट नावे नमूद करण्यात आली होती. संजय राऊत यांच्यासाठी ‘एस रहाटे’ आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी ‘खडसणे’ हे नाव वापरण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.